esakal | Corona Update: कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट; गेल्या 24 तासांत 78 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे.

Corona Update: कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट; गेल्या 24 तासांत 78 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 10,584 नवे रुग्ण सापडले आहेत. सोमवारपेक्षा आज नोंदल्या गेलेल्या रुग्णात मोठी घट पाहायला मिळाली आहे. सोमवारी कोरोनाचे 14,199 रुग्ण सापडले होते. दुसरीकडे महाराष्ट्र आणि केरळसारख्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये कोरोनासंबंधी खबरदारी घेतली जात आहे.  

देशातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1 कोटी 7 लाखांच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 10,584 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,10,16,434 वर गेली आहे. दुसरीकडे गेल्या 24 तासात कोरोनामुळे 78 रुग्णांचा जीव गेला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1,56,463 झाली आहे. 

Success Story : शेळ्या राखणाऱ्यांचा मुलगा झाला पीएसआय

मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1,07,12,665 झाली आहे. मागील 24 तासांत 13,255 रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाखांपेक्षा कमी आहे. देशात कोरोनाचे 1,47,306 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत  1,17,45,552 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली गेली आहे. देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

गेल्या आठवड्यातील वृद्धी दराबाबत सांगायचं झालं तर सरासरी 13.8 इतका आहे. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. केंद्राने या पाच राज्यांना खबरदारीचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात यावं, कोरोनाची साखळी तोडायची असेल तर हे गरजेचं आहे असंही केंद्राने म्हटलं आहे. 

सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे सक्रुय रुग्णांमध्ये केरळ आणि महाराष्ट्रातील रुग्णांचे प्रमाण जवळपास 74 टक्के इतकं आहे. छत्तीसगढ, मध्य प्रदेश, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्येही दर दिवशी नवीन रुग्ण आढळून येत आहेत. सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात एका आठवड्यात नवीन रुग्णांची सरासरी ही 5 हजार 230 इतकी आहे. 2 डिसेंबरला राज्यात 5 हजार 576 रुग्ण सापडले होते त्यानंतर 22 फेब्रुवारीला महाराष्ट्रात 6 हजार 971 रुग्ण आढळले. याआधी सर्वाधिक रुग्ण 24 ऑक्टोबरला 7 हजार 347 इतके सापडले होते. याशिवाय केरळमध्ये गेल्या आठवड्यात नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण 4 हजार 361 इतकं आहे.