
चिनी लष्कराच्या वर्तनामुळे सिमेवरील शांतता भंग,भारताचे प्रत्युत्तर
पूर्व लडाखमधील गोंधळासाठी भारताला जबाबदार धरण्याच्या चीनच्या प्रयत्नांवर टीका केली जात आहे. चीनच्या प्रक्षोभक वर्तनामुळे सिमार्ती भागात शांतता भंग झाल्याचे सांगत भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले.
चिनी लष्कराचे प्रक्षोभक वर्तन आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील जागा स्थिती बदलण्याच्या एकतर्फी प्रयत्नामुळे शांतता भंग झाल्याचं भारताने म्हटलं आहे. चीनने भारतीय लष्करावर आरोप केले होते. या आरोपांवर भारताकडून स्पष्टीकरण देण्यात आले.
चीनने सीमावर्ती भागात मोठ्या संख्येने शस्त्रास्त्र आणि सैन्य तैनात केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली. चीनच्या कारवाईला प्रतिसाद म्हणून भारतीय सशस्त्र दलांना तैनात करावे लागले आहे. चीनच्या आरोपांना कोणताही आधार नाही आणि द्विपक्षीय करार आणि प्रोटोकॉलचे पूर्ण पालन करून उर्वरित समस्या लवकर सोडवण्याच्या दिशेने काम करावे अशी भारताची अपेक्षा असल्याचे बागची यांसी सांगितले.
चीनने अलीकडेच लडाखच्या सिमेवरील वादावरून भारतावर आरोप केले होते. दोन्ही देशांमधील तणावाचे मूळ कारण भारताचे धोरण आणि बेकायदेशीरपणे चीनच्या भूभागावर केलेलं अतिक्रमण असल्याचं चीनने म्हटलं होतं. मात्र, या सर्व आरोपांना कोणताही आधार नसल्याचे भारताने स्पष्ट केलं आहे. तसेच या आरोपाला प्रत्युत्तर देखील दिल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
Web Title: India Retaliates China Army From Lac
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..