
पहलगाम येथे भारतीय जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर भारताने “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांवर जोरदार कारवाई केली. या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच राष्ट्राला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी देशवासीयांना आश्वासन दिलं की भारत दहशतवादाचा कठोरपणे सामना करणार असून, शहीद जवानांचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे सांगितलं की, देशाच्या सुरक्षेवर कोणीही हात घातला तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल.