

Samudra Manthan project
esakal
deepwater oil gas exploration: भारताने आपल्या आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षेसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'समुद्र मंथन' नावाच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी सरकारने तब्बल ८४,०८४ कोटी रुपयांच्या महाकाय निधी खर्च करण्याची तयारी ठेवली आहे.