यंदाच्या मॉन्सूनमध्ये १२५ वेळा अतिवृष्टी; गेल्या पाच वर्षांतील विक्रम

देशात सप्टेंबरमध्ये ८९ वेळा अतिवृष्टी झाली. गेल्या वर्षी ६१ वेळा अतिवृष्टी झाली होती
rain
rainsakal media
Updated on

नवी दिल्ली : यंदाच्या मॉन्सूनच्या उत्तरार्धात म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत देशात अतिवृष्टीच्या तब्बल १२५ घटनांची नोंद झाली. मॉन्सूनने उशिरा माघार घेणे आणि सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात कमी दाबाची क्षेत्रे तयार होणे, याला कारणीभूत ठरले, अशी माहिती हवामान खात्याने आज दिली.

देशात सप्टेंबरमध्ये ८९ वेळा अतिवृष्टी झाली. गेल्या वर्षी ६१ वेळा अतिवृष्टी झाली होती. त्याचप्रमाणे, यंदा ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीच्या ३६ घटनांची नोंद झाली. गेल्या वर्षी फक्त १० वेळा अतिवृष्टीझाली. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मॉन्सूनने उशिरा परतल्यामुळे तसेच कमी दाबाची सामान्यापेक्षा अधिक क्षेत्रे तयार झाल्यामुळे या वर्षी अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढ झाली.

त्याचप्रमाणे, ऑक्टोबरमध्ये कमी दाबाच्या क्षेत्राबरोबरच सक्रिय पश्चिम चक्रवातामुळेही अतिवृष्टीला अनुकूल वातावरण तयार झाले. या दोन महिन्यांत कमी दाबाची तब्बल नऊ क्षेत्रे तयार झाली. त्यातील दोन क्षेत्रांचे चक्रीवादळांत रूपांतर झाले. त्यामुळेही पाऊस वाढला. याशिवाय यात एका तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचाही समावेश होता. या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे अतिवृष्टी झाली. साधारणतः: २०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस अतिवृष्टी समजला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Latest Marathi News Live Update
Supreme Court stay on Tamil Nadu cow slaughter ban order
IMD predicts heavy rainfall
Vijay's TVK Eyes Majority as 10 AIADMK Legislators May Switch Sides
Marathi News Esakal
www.esakal.com