
India Pakistan air clash: पाकिस्ताननं जम्मू आणि पंजाबमधील अनेक ठिकाणी हल्ले केल्यानंतर भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने अर्थात S400 सिस्टिमनं पाकिस्तानचं एफ-१६ विमान पाडल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या उधमपूर आणि राजस्थानच्या जैसलमेरमध्येही ड्रोन हल्ले उधळण्यात आले आहेत आणि अखनूरमध्ये एक ड्रोन पाडण्यात आला आहे. पूंछमध्ये दोन कामिकाझे ड्रोनही पाडण्यात आले आहेत.