लाचखोरीच्या बाबतीत भारताला ८२ वे स्थान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाचखोरीच्या बाबतीत भारताला ८२ वे स्थान

लाचखोरीच्या बाबतीत भारताला ८२ वे स्थान

नवी दिल्ली : उद्योगांतील लाचखोरीच्या जोखमीबाबतीत आंतरराष्ट्रीय क्रमवारीमध्ये भारताचे स्थान पाच अंकांनी घसरले असून यंदा भारत ८२ व्या स्थानी आला आहे. याच क्रमवारीमध्ये भारत मागील वर्षी ७७ व्या स्थानी होता. लाचखोरीचा मागोवा घेणारी संघटना ट्रेसने याबाबतची क्रमवारी प्रसिद्ध केली आहे.

या संघटनेने १९४ देशांत सर्वेक्षण केले होते. यंदा प्रसिद्ध झालेल्या क्रमवारीनुसार उत्तर कोरिया, तुर्कमेनिस्तान, व्हेनेझुएला आणि एरिट्रीया या देशांमध्ये व्यावसायिक लाचखोरीची जोखीम मोठी असून डेन्मार्क, नॉर्वे, फिनलंड, स्वीडन आणि न्यूझीलंडमध्ये ती तुलनेने कमी असल्याचे दिसून आले आहे.

या क्रमवारीमध्ये भारत २०२० साली ७७ व्या स्थानी होती. यंदा तो ४४ अंकांसह ८२ व्या स्थानी पोचल्याचे ताज्या आकडेवारीतून दिसून येते. या सर्वेक्षणासाठी चार घटकांचा आधार घेण्यात आला होता त्यात सरकार आणि उद्योग यांच्यातील संवाद, लाचखोरीविरोधातील कारवाई, सरकारी आणि नागरी सेवा यांच्यातील पारदर्शकता आणि सिव्हिल सोसायटींची क्षमता (माध्यमांची भूमिका) आदींचा समावेश होता.

loading image
go to top