
नवी दिल्ली : ड्रोनद्वारे अचूक सोडल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारताने शुक्रवारी केली.आंध्र प्रदेशमधील कर्नुल जिल्ह्यातील ‘नॅशनल ओपन एरिया रेंज’ (एनओएआर) चाचणी केंद्रात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ही यशस्वी चाचणी केली, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी ‘एक्स’वर आज दिली.