Air Transport |हवाई वाहतुकीत भारत दशकात अव्वल; ज्योतिरादित्य शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jyotiraditya scindia removes congress identity from his twitter
हवाई वाहतुकीत भारत दशकात अव्वल; ज्योतिरादित्य शिंदे

हवाई वाहतुकीत भारत दशकात अव्वल; ज्योतिरादित्य शिंदे

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकता - पुढील दशकभरात भारत हवाई वाहतूक क्षेत्रात अव्वलस्थानी असेल, असा विश्वास केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला. हवाई वाहतूक क्षेत्राला एका उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मार्गावरील संपर्क वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. विमानतळांची संख्या आताच्या १३६ वरून वाढवून २२० करण्याचे उद्दिष्ट भारत सरकारचे आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

शिंदे म्हणाले, ‘‘मागील ७० वर्षांत ७४ विमानतळ निर्माण झाले, पण मागच्या केवळ सात वर्षांत आपण ६२ नवीन विमानतळ बांधले. आता आपल्याकडे १३६ विमानतळ आहेत, पण आपण इथेच थांबणार नाही. २०२५ पर्यंत देशात २२० विमानतळ बांधण्याचा आपला निर्धार आहे. त्यात हेलिपोर्ट आणि वॉटरपोर्टदेखील असतील. उद्या नोएडाजवळ आपण जेवार विमानतळाचे उद्‍घाटन करत आहोत.’’

loading image
go to top