लहान मुलं व्हायरल तापाच्या विळख्यात; कशी घ्यायची काळजी?

fever
fever
Summary

उत्तर प्रदेशात फिरोजाबाद, मथुरेत व्हायरल तापामुळे लहान मुलांना प्राण गमवावे लागले आहेत. एका महिन्यात उत्तर प्रदेशात १०० हून अधिक जणांचा यामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.

एका बाजुला देशात कोरोनाचं संकट असताना त्यातच व्हायरल तापाने हाहाकार माजवला आहे. उत्तर प्रदेशात फिरोजाबाद, मथुरेत व्हायरल तापामुळे लहान मुलांना प्राण गमवावे लागले आहेत. एका महिन्यात उत्तर प्रदेशात १०० हून अधिक जणांचा यामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर, प्रयागराज, गाझियाबादमध्येही या तापाची साथ आहे. एवढंच नाही तर दिल्ली, बिहार, हरयाना, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्येही याचे काही रुग्ण आढळले आहे. मात्र सुदैवाने या राज्यांमध्ये मृत्यूची नोंद झालेली नाही.

लहान मुलांना वर्षभरात सहा सात वेळा श्वसनाद्वारे संसर्ग होतो. यातच गेल्या दीड दोन वर्षांपासून कोरोनामुळे लॉकडाऊन आणि त्याच्या निर्बंधातून मुलं पुन्हा बाहेर पडत आहेत. त्यामुळे हा संसर्ग पसरण्याची अनेक कारणं मिळतील. दुसरं कारण शिळं जेवण आणि अशुद्ध पाणी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

व्हायरल इन्फेक्शनमध्ये इन्फ्लुएन्झा, डेंग्यु, चिकुनगुनिया यांचा समावेश असून ऑगस्टपासून लहान मुलांना याची लागण होत आहे. डेंग्यु, चिकुनगुनिया आणि मलेरिया हे मान्सूननंतरचं वातावरणामुळे होतात असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. व्हायरल तापामधील बहुतांश हे इन्फ्लुएन्झा किंवा डेंग्यु असतात. यामुळे रुग्णांना अशक्तपणा येतो. तसंच मोठ्या प्रमाणावर शरीर दुखतं. या तापांवर लक्षणांचे उपचार आणि हायड्रेशन योग्य होण्याची गरज असल्याचं डॉक्टर अनामिका दुबे यांनी म्हटलं आहे.

व्हायरल फ्लूशिवाय डेंग्युच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. याबाबत डॉक्टर मीना जे म्हणतात की, दर दिवशी आम्हाला द्वारकामध्ये मुलांमध्ये तीन ते पाच रुग्ण सापडतात. मुलांमध्ये ताप, अंगदुखीचा त्रास असतो. रक्ताची चाचणी केल्यानंतर याचं निदान होतं. प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्याचं प्रमाण वाढलं आहे. जर रुग्णांमध्ये रक्तस्राव होत असेल आणि प्लेटलेट्स कमी असतील तर प्लेटलेट ट्रान्सफ्युजनची गरज पडते असंही त्यांनी सांगितलं.

गेल्या वर्षी तापाचे लहान मुलांमध्ये तापाची साथ कमी प्रमाणात दिसली कारण कोरोनाचे संकट आणि त्याला रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन हे ठरले. जुलै ते नोव्हेंबरच्या दरम्यान हे रुग्ण आढळतात पण हा कालावधी यावेळी डिसेंबरपर्यंत असू शकतो असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

तज्ज्ञांना मते स्क्रब टायफस हे अधिक घातक ठरु शकतं. याबाबत डॉक्टर मीना यांनी सांगितलं की, एका सहा-सात वर्षांच्या रुग्णाला दोन आठवडे ताप होता. ब्लड टेस्ट केल्यानंतर त्याला स्क्रब टायफस असल्याचं समोर आलं. उपचारानंतर त्याला डिस्चार्ज दिला गेला पण स्क्रब टायफस जीवावर बेतू शकतो. गंभीर आजार नसल्यानं औषधं देऊन घरी सोडलं गेलं. पण साथीच्या स्थितीमध्ये प्रत्येक तापाच्या रुग्णाची तपासणी करणं, त्याचं योग्य निदान गरजेचं आहे. योग्य औषधोपचाराने मुल बरं झालं पण या आजाराने जीव गमवावा लागू शकतो.

व्हायरल तापाच्या साथीपासून वाचण्यासाठी काय करावं याबद्दल सांगताना डॉक्टर मीना म्हणतात की, डासांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरतील अशा जागा स्वच्छ करून घ्या. पाणी साचून राहणार नाही आणि लहान मुलांना डास चावणार नाहीत याची काळजी घ्या.

लहान मुलांना १०३-१०४ ताप असेल किंवा जर ताप नसेल पण लहान मूल जेवण खात नसेल, पाणी पित नसेल तर त्याला रुग्णालयात न्यायला हवं. शरिरावर रॅशेस किंवा लघवीची तक्रार असेल तर डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या. लहान मुलांना त्यानतंर रुग्णालयात दाखल करायचं की उपचार करून घरी सोडायचं याबाबत डॉक्टर मार्गदर्शन करतील असं दिल्लीतील डॉक्टर धिरेन गुप्ता यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com