नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळ उध्वस्त केल्याची दमदार कामगिरी भारताने केल्यानंतर आता पाकिस्तानी सैन्याने पुन्हा आगळीक केली आहे. गुरुवारी संध्याकाळपासून पाकिस्तानी हवाई दल आणि सैन्याने भारतात विविध ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला. या कुरापतींना भारतानेही ठाम प्रत्युत्तर दिले आहे. त्याचवेळी राजनैतिक पातळीवरही भारताने अधिक कठोर व स्पष्ट भूमिका घेत पाकिस्तानला दम भरला.