Indian Air Force : तेरा हजार फुटांवरील धावपट्टीवर ‘आयएल-७६’ हवाई दलाची ऐतिहासिक कामगिरी; चीनबरोबरील ‘एलएसी’जवळ लँडिंग

Indian Air Force IL-76 Landing : भारतीय हवाई दलाच्या आयएल-७६ एमडी विमानाने पूर्व लडाखमधील न्योमा हवाई तळावर १३,६०० फूट उंचीवर यशस्वी लँडिंग केले. चीन सीमेवरील भारताची सामरिक हवाई क्षमता अधिक बळकट झाली.
Indian Air Force IL-76 Lands at Nyoma Airbase

Indian Air Force IL-76 Lands at Nyoma Airbase

esakal

Updated on: 

नवी दिल्ली (पीटीआय) : हवाई दलातील आयएल-७६ एमडी हे रशियन बनावटीचे विमान पूर्व लडाखमधील न्योमाच्या हवाई तळावर यशस्वीपणे उतरले. समुद्रसपाटीपासून १३,६०० फूट उंचीवर आणि चीनबरोबरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून (एलएसी) अवघ्या २५ किलोमीटरवर असलेल्या या हवाई तळावर अवजड वाहतुकीसाठी अत्यंत उपयुक्त विमान उतरणे, भारतीय संरक्षण दलासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. ‘आयएल-७६’ विमान प्रथमच एवढ्या उंचीवर उतरले असून, तोही विक्रम भारतीय हवाई दलाच्या नावावर नोंदविण्यात आला आहे.

‘हवाई दलाच्या आयएल-७६ एमडी विमानाने न्योमा येथे यशस्वी लँडिंग करून इतिहास घडविला आहे. जगात या विमानाने केलेले हे आतापर्यंतचे सर्वाधिक उंचीवरील लँडिंग आहे,’ असे हवाई दलाने सोशल मीडियावरील संदेशात म्हटले आहे. या कामगिरीमुळे भारताची सामरिक हवाई वाहतूक क्षमता अधिक बळकट झाली असल्याचेही हवाई दलाने नमूद केले. तसेच, यातून विमानाची क्षमता आणि हवाई दलातील अधिकाऱ्यांचे असामान्य कौशल्य, अचूकता व व्यावसायिकता दिसून येते, असे हवाई दलाने म्हटले आहे.

Loading content, please wait...