MiG-21 retirement: तब्बल सहा दशकांहून अधिक काळ देशाचे रक्षण केल्यानंतर आता ‘मिग-21’ निरोप घेणार

Indian Air Force News : २६ सप्टेंबर रोजी शेवटचे उड्डाण घेणार; जाणून घ्या, वायुदलाने कशाप्रकारे केली आहे निरोपसमारंभाची तयारी?
Indian Air Force bids farewell to MiG-21 fighter jets after over six decades of dedicated service in safeguarding the nation.

Indian Air Force bids farewell to MiG-21 fighter jets after over six decades of dedicated service in safeguarding the nation.

esakal

Updated on

MiG-21 Retirement: End of an Era for Indian Air Force: देशातील पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान सुमारे ६२ वर्षांपूर्वी जिथे आले होते त्याच ठिकाणाहून देशाला निरोप देणार आहे. सुमारे सहा दशके हवाई दलाचा भाग असलेले मिग-21 विमान २६ सप्टेंबर रोजी चंदीगडमध्ये निरोप दिल्यानंतर इतिहासाचा भाग बनेल. शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या मिग-21 ला वेगळ्या आणि खास पद्धतीने निरोप देण्याची तयारी हवाई दल करत आहे.

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हवाई दलाने मिग 21 उडवणाऱ्या जवळजवळ सर्व वैमानिकांना आमंत्रित केले आहे. या दरम्यान, १९६५ आणि १९७१ च्या युद्धांमध्ये मिग-21 ने पाकिस्तानला ज्या प्रकारे धडा शिकवला होता, तो सीन पुन्हा रीक्रीएट केला जाईल.

या दरम्यान, मिग-21चे एक लढाऊ प्रात्याक्षिक देखील होईल ज्यामध्ये हे विमान शत्रूच्या लढाऊ विमानांना पाडण्यासाठी कसे वापरले जायचे हे दाखवले जाईल. ज्या काळात आजच्यासारखे रडार सिस्टीम किंवा आधुनिक युद्ध तंत्रे नव्हती, त्या काळात मिग 21 वर मात करणे कोणालाही शक्य नव्हते.

Indian Air Force bids farewell to MiG-21 fighter jets after over six decades of dedicated service in safeguarding the nation.
Sonia Gandhi case: सोनिया गांधींच्या अडचणी वाढणार? दिल्लीच्या कोर्टात आता नवीन तक्रार दाखल!

मिग-21 च्या निरोपाच्या या खास प्रसंगी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह देखील उपस्थित राहतील. उड्डाण केल्यानंतर, मिग 21 च्या स्क्वाड्रनची चावी संरक्षण मंत्र्यांना सुपूर्द केली जाईल, त्यानंतर हे विमान कायमचे इतिहासाचा भाग होईल. स्वदेशी लढाऊ हलके लढाऊ विमान तेजस मार्क 1ए हे मिग-21 सारखी भूमिका बजावण्यास सज्ज आहे आणि लवकरच हवाई दलात सामील होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com