न्यूयॉर्कच्या न्यायाधीशपदी मराठमोळ्या दीपा आंबेकर

वृत्तसंस्था
शनिवार, 5 मे 2018

दीपा आंबेकर यांनी न्यूयॉर्क सिटी कौन्सिलमध्ये 'सिनियर लेजिस्लेटिव्ह कौन्सिल'चा पदभार स्वीकारला होता. 'अ‍ॅक्सेन्चर' या सल्लागार कंपनीत त्यांनी नोकरी केली. त्यावेळी त्यांनी पगारातील पैसे वाचवून 'रटगर्स लॉ स्कूल'मध्ये कायद्याची पदवी संपादन केली.

नवी दिल्ली : मूळच्या भारतीय असलेल्या दीपा आंबेकर यांची न्यूयॉर्कमधील गुन्हेगारी न्यायालयाच्या (क्रिमीनल कोर्ट) न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. दीपा आंबेकर यांच्या नियुक्तीने न्यूयॉर्कमध्ये भारतीयांसह मराठी माणसाची मान अभिमानने उंचावली आहे. दीपा आंबेकर न्यूयॉर्कमधील तिसऱ्या भारतीय स्त्री न्यायाधीश ठरल्या आहेत.

दीपा आंबेकर यांनी न्यूयॉर्क सिटी कौन्सिलमध्ये 'सिनियर लेजिस्लेटिव्ह कौन्सिल'चा पदभार स्वीकारला होता. 'अ‍ॅक्सेन्चर' या सल्लागार कंपनीत त्यांनी नोकरी केली. त्यावेळी त्यांनी पगारातील पैसे वाचवून 'रटगर्स लॉ स्कूल'मध्ये कायद्याची पदवी संपादन केली. तसेच त्यांनी 'युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन', अ‍ॅन आर्बर विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. त्यानंतर दीपा यांनी एका शाळेत शिक्षिका म्हणून काम केले. लॉ फर्ममधील मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्यांच्या पगाराच्या तब्बल 70 टक्के कमी वेतन स्वीकारुन त्यांनी 'लीगल एड्स सोसायटी'साठी काम सुरु केले. 

त्यांनी वकिली क्षेत्रात मोठे योगदान दिले असून, दोन हजार गरजू व्यक्तींच्या बाजूने खटले लढवले. त्यानंतर आता न्यूयॉर्कच्या महापौरांनी दीपा आंबेकर यांची न्यायाधीशपदी नियुक्ती केली.

Web Title: Indian American Deepa Ambekar appointed interim court judge in New York