
जम्मू : भारतीय लष्कराने भगवतीनगरजवळ तावी नदीवर चौथ्या बेली ब्रिजचे काम बारा तासांत पूर्ण केले. काही दिवसांपूर्वी प्रचंड पाऊस आणि नदीची पातळी वाढल्याने या पुलाचा एक भाग वाहून गेला होता. मेजर सोमनाथ चौक ते भगवतीनगर यांना जोडणाऱ्या बेली ब्रिज उभारला निर्मिती केली असून तो लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.