Indian Army: भारतीय लष्कराने बदलले फिटनेसचे नियम; सुधारणा न झाल्यास सुट्ट्या होणार कमी?

Indian Army changes fitness rules: भारतीय लष्कराने लठ्ठपणा किंवा वाईट जीवनशैली जगणाऱ्या सैनिकांविरोधात कारवाईची तयारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराने नवीन नियम लागू केले आहे.
Indian Army changes fitness rules
Indian Army changes fitness rules

नवी दिल्ली- भारतीय लष्कराने लठ्ठपणा किंवा वाईट जीवनशैली जगणाऱ्या सैनिकांविरोधात कारवाईची तयारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराने नवीन नियम लागू केले आहेत. याअंतर्गत जवानांच्या वेगवेगळ्या तपासण्या होतील. विशेष म्हणजे सैनिकांना सुधारण्यासाठी ३० दिवसांचा वेळ देण्यात येईल. सुधारणा न झाल्यास सैनिकांच्या सुट्ट्या कमी करण्यासारखे निर्णय घेतले जाऊ शकतात.(Indian Army changes fitness rules If there is no improvement the holidays will be less)

नव्या नियमांनुसार सर्व सैनिकांना आर्मी फिजिकल फिटनेस असेसमेट कार्ड तयार ठेवावे लागणार आहे. शारीरिक दृष्टीने अयोग्य आणि लठ्ठपणा आल्यामुळे अनेक आजार बळावतात. याव लगाम लावण्याचा आणि सैनिकांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी लष्कर प्रयत्न करत आहे. इंडियन एक्स्रेसच्या रिपोर्टनुसार, सर्व सैनिक दलांना यासंदर्भातील नोटिफिकेशन पाठवण्यात आलं आहे.

Indian Army changes fitness rules
US Drone Attack: जॉर्डनमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला; तिघांचा मृत्यू, व्हाईट हाऊसचा गंभीर इशारा

आता काय आहेत नियम?

सध्या प्रत्येक तीन महिन्यांनी बॅटन फिजिकल इफिशीएंसी टेस्ट आणि फिजिकल प्रोफीशियंसी टेस्ट होते. BPET टेस्टमध्ये जवानाला ५ किलोमीटर पळणे, ६० मीटरची स्प्रिंट, दोरीच्या साहाय्याने वरती चढणे आणि निश्चित वेळेमध्ये ९ फूट खड्डा पार करावा लागतो. वयानुसार ही वेळ बदलत असते.

PPT मध्ये २.४ किमी धावणे, ५ मीटर शटल, पुश अप्स, चिन अप्स, सिट अप्स आणि १०० मीटर स्प्रिंट करावी लागते. या सर्व टेस्ट करण्यात आल्यानंतर याचा समावेश एसीआर रिपोर्टमध्ये करण्यात येतो.

Indian Army changes fitness rules
इस्राइलचा मोठा निर्णय! मुंबईवर हल्ला करणारी 'लष्कर-ए-तोयबा' दहशतवादी संघटना घोषित

आता काय असतील नियम?

सैनियांची BPET आणि PPT टेस्ट तर केली जाईलच, पण इतर काही टेस्टचा समावेश देखील करण्यात आला आहे. यात १० किमीचे स्पीड मार्च आणि ६ महिन्यांत ३२ किमीचा रुट मार्च याचा समावेश असेल. सर्व सैनिकांना फिजिकल असेसमेंट कार्ड तयार ठेवावे लागेल. तसेत त्याचे निष्कर्ष २४ तासांमध्ये उपलब्ध करुन द्यावे लागतील. रिपोर्टनुसार, ब्रिगेडियर रँकचे अधिकार, दोन कर्नल आणि एक मेडिकल अधिकारी तीन महिन्यांना जवानांच्या फिटनेसचे मूल्यांकन करतील.

नापास झाल्यास काय?

जे सैनिक टेस्टमध्ये अपयशी ठरतील किंवा लठ्ठ आढळतील. त्यांना सुरुवातीला ३० दिवसांचा वेळ सुधारण्यासाठी देण्यात यईल. तरीही सुधारणा झाली नाही तर त्यांच्या सुट्टा कमी करण्यात येतील आणि टीडी कोर्सेस कमी करण्यात येतील. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com