
ULFA(I)’s Statement on the Alleged Drone Strike: दहशतवादी संघटना उल्फा (आय) ने दावा केला आहे की भारतीय लष्कराने म्यानमार सीमेवरील त्यांच्या छावण्यांवर ड्रोन हल्ले केले आहेत. तसेच उल्फा (आय) च्या मते, या हल्ल्यात एक वरिष्ठ नेता ठार झाला आणि सुमारे १९ जण जखमी झाले. संरक्षण प्रवक्त्याने हा दावा फेटाळला आहे. लष्कराने अशा कोणत्याही कारवाईची माहिती नसल्याचे म्हटले आहे.
उल्फाच्या या दाव्यावर लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत म्हणाले, भारतीय लष्कराला अशा कोणत्याही कारवाईची माहिती नाही. उल्फा (आय) ने एका निवेदनात म्हटले आहे की, पहाटे अनेक मोबाइल छावण्यांवर ड्रोन हल्ले करण्यात आले.
या संघटनेचा दावा आहे की या हल्ल्यांमध्ये संघटनेचा एक वरिष्ठ नेता मारला गेला, तर सुमारे १९ जण जखमी झाले. तर प्राप्त माहितीनुसार, या ड्रोन हल्ल्यात उल्फा-आय व्यतिरिक्त, एनएससीएन-केच्या लपण्याच्या ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. या संघटनेचे अनेकजण मारले गेले आहेत.
युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम ही आसाममध्ये सक्रिय असलेली एक मोठी दहशतवादी आणि अतिरेकी संघटना आहे, जी १९७९ मध्ये स्थापन झाली. त्या काळात बरुआ यांनी त्यांच्या साथीदारांसह ही संघटना स्थापन केली. यामागील कारण सशस्त्र संघर्षाद्वारे आसामला स्वायत्त आणि सार्वभौम राज्य बनवण्याचे ध्येय होते. केंद्र सरकारने १९९० मध्ये त्यावर बंदी घातली आणि लष्करी कारवाई देखील सुरू केली.
२००८ मध्ये उल्फा नेता अरबिंदा राजखोवा याला बांगलादेशातून अटक करण्यात आली आणि नंतर त्याला भारतात सोपवण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.