खानापूर : खानापूर-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर (Indian Army Jawan Accident) प्रभूनगरजवळ गुरुवारी (ता. ३१) दुपारी अपघातात खानापूर येथील भारतीय सेनेतील जवान जागीच ठार झाल्याची घटना घडली. जागीच ठार झालेल्या जवानाचे नाव सूरज मोहन द्रौपदकर (वय २९, रा. विद्यानगर, खानापूर) असे आहे.