esakal | भारतीय लष्कर आर्थिक संकटात; उपकरणे भाड्याने घेण्याची आली वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi News International News Drone 4 Terrorists dead

भारतीय लष्कर आर्थिक संकटात; उपकरणे भाड्याने घेण्याची आली वेळ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - सध्या देश कोरोनाच्या (Covid 19) संकटाशी लढा देत आहेच. यामध्ये आता लष्कराचीही मदत घेतली जात आहे. दरम्यान, भारतीय लष्कर (Indian Army) आता आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचं चित्र आहे. विमान, हलक्या वजनाची हेलिकॉप्टर्स, ट्रेनिंग विमाने ते ड्रोन इत्यादीची गरज भासत आहे. मात्र, सध्या इतकी बिकट परिस्थिती आहे की, आर्थिक संकटामुळे लष्कराला एखादी मोहिम चालवण्यासाठी शस्त्रास्त्रे आणि उपकरणे ही भाड्याने घ्यावी (equipment on lease) लागत असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. (indian army militry cash crunch take equipment on lease)

सध्या भारतीय लष्कर इस्रायलकडून चार अद्ययावत असे हेरॉन मार्क 2 हे युएव्ही भाड्याने घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. नौदलाने याआधीच नोव्हेंबर महिन्यात एका अमेरिकन कंपनीकडून एम क्यू 9 बीसी गार्डियन ड्रोन घेतले असून त्याचा वापर समुद्र किनाऱ्यावर गस्त घालण्यासाठी केला जात आहे.

हेही वाचा: Corona Update - देशात गेल्या 24 तासात मृत्यूचा उच्चांक

नौदलानेसुद्धा नुकतंच पाच वर्षाच्या कालावधीसाठी 24 डबल इंजिन असलेल्या सशस्त्र अशा हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरसाठी परदेशी कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. तर दुसरीकडे युद्धनौकांवरून चालवण्यात 111 नौदलाच्या हेलिकॉप्टर्ससाठी 21 हजार कोटी रुपयांच्या मेक इन इंडिया प्रोजेक्टला उशिर होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका प्रक्रियेअंतर्गत भाडेतत्वाच्या प्रक्रियेची तरतूद करण्यात आली होती. यामुळे वेळेची बचत होईल आणि सुरुवातीला लागणाऱी रक्कमही कमी लागेल.

loading image
go to top