भारतीय सैनिक शिकणार चिनी भाषा; ड्रॅगनची रणनीती समजणार

भारताचा शेजारी राष्ट्र चीन नेहमीच काहीना काही कुरघोड्या करून भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत असतो.
India-China Border
India-China BorderSakal Media

नवी दिल्ली : भारताचा शेजारी राष्ट्र चीन (China) नेहमीच काहीना काही कुरघोड्या करून भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत असतो. चीनच्या या खोड्या भारतीय सैनिकही (India Army) तेवढ्याच हुशारीने पुन्हा परतावून लावत असतात. मात्र, आता खोडकर चीनची रणनीती समजून घेण्यासाठी भारतीय सैनिक मंदारिन ही चिनी भाषा शिकण्यावर भर देत आहेत. याशिवाय सैनिकांना चीनबद्दल माहिती दिली जाणार आहे. यामुळे चीन ड्रॅगनची रणनीती समजण्यास सैनिकांना मदत होणार आहे. हायब्रिड वारफेअरदरम्यान माहितीकडे एक महत्त्वाचे शस्त्र म्हणून पाहिले जात असल्याने भारतीय लष्कर या आघाडीवर लक्ष केंद्रित करत आहे. लष्कराच्या या प्रयत्नाला लडाखमधील चीनच्या आक्रमकतेशी जोडले जात आहे. (Indian Soldiers Learn Chinese Language)

India-China Border
"काँग्रेसमध्ये आवडत नसेल, तर.."; हार्दिक पटेल यांना 'आप'कडून ऑफर

सुमारे दोन वर्षांपूर्वी पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती, ज्यामध्ये 20 जवान शहीद झाले होते. याशिवाय चिनी सैनिकही मोठ्या प्रमाणात मारले गेले होते. नुकतेच लष्करप्रमुख एमएम नरवणे यांना एक प्रेझेंटेशन देण्यात आले, ज्यामध्ये मंदारिन शिकण्याचे सांगण्यात आले आहे. याअंतर्गत सैनिकांना मंदारिनचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय विद्यापीठे आणि इतर संस्थांमध्ये मंदारिन भाषादेखील शिकवली जाईल जेणेकरून चीनची भाषा समजणारे लोक तयार करता येतील.

आतापर्यंत, पूर्व लडाखमधील सैन्याची तैनाती कमी करण्याचे कोणतेही संकेत चीनकडून मिळालेले नाहीत. या मुद्द्यावर नुकतेच भारत दौऱ्यावर आलेले चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनाही कडक संदेश देण्यात आला आहे. यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर जोपर्यंत सैन्याची तैनाती आणि सीमेवरील तणाव कमी होत नाही तोपर्यंत दोन्ही देशांमधील संबंध सामान्य होऊ शकणार नाहीत, असे म्हणाले होते.

India-China Border
संजय राऊत तुम्ही विश्व प्रवक्ते, खालच्या लेव्हलवर येऊ नका; संजय कुटे

दरम्यान, 18 ते 22 एप्रिल दरम्यान आर्मी कमांडर्सची परिषद होणार आहे. यादरम्यान लष्करप्रमुख ऑपरेशन परिस्थितीचा आढावा घेतील. याशिवाय, 3,488 किमी लांबीच्या LAC सीमेवर पायाभूत सुविधांच्या विकासाविषयी देखील माहिती मिळेल. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धातून मिळालेल्या धड्यांवरही या परिषदेत चर्चा होणार आहे. यादरम्यान रशिया आणि युक्रेनसारखी युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास भारताने कोणती पावले उचलायची याचा आराखडा तयार केला जाणार आहे. गेल्याच वर्षी लष्कराने आपल्या काही सैनिकांसाठी तिबेटोलॉजीचा अभ्यासक्रम सुरू केला होता त्या नंतर आता सैनिकांना मंदारिन ही चिनी भाषा शिकवली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com