
Viral Video : जवानांना कधी पक्षाप्रमाणे उडताना पाहिले का? लष्करात दाखल होणार नवीन टेक्नॉलॉजी
संवेदनशील सीमा भागात टेहळणी यंत्रणा मजबूत करण्यासाठी आणि शत्रूच्या प्रत्येक हालचालीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सतत हायटेक योजना आखत आहे. दरम्यान, भारतीय लष्कराने ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीज या ब्रिटिश कंपनीने विकसित केलेल्या जेटपॅक सूटची चाचणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आग्रा येथील इंडियन आर्मी एअरबोर्न ट्रेनिंग स्कूल (एएटीएस) मध्ये नुकतेच या उपकरणाचे प्रात्यक्षिक पार पडले आहे.
जेटपॅक सूट हे वैयक्तिक उड्डाण तंत्रज्ञान आहे. जे एखाद्या व्यक्तीला शरीराला जोडलेले लहान पण शक्तिशाली इंजिन वापरून उड्डाण करू देते. सूटमध्ये विशेषत: डिझाइन केलेल्या सूटला तीन लहान जेट इंजिन असतात, जे परिधानकर्त्याला त्यांच्या हालचाली आणि उड्डाणाची दिशा नियंत्रित करण्यास मदत करतात.
या सूटच्या माध्यमातून भारतीय जवान एखाद्या सुपरहिरोप्रमाणे हवेत उडू शकतील. डमोदरम्यान हा जेट पॅक फ्लाइंग सूट परिधान करून एका व्यक्तिने ५१ किमी अंतर कापले. तो व्यक्ती डेमोमध्ये रस्ते, इमारती आणि अगदी नद्या ओलांडताना दिसला. हा सुट धारण करून १२ हजार फूट उंचीवर जाता येते, असे त्यांनी सांगितले.
रिचर्ड ब्राउनिंग यांनी ढोलपूर येथील आर्मी स्कूलमध्ये त्यांच्या जेट पॅक सूटचा डेमो दिला होता. व्हिडिओमध्ये, ब्राउनिंग जेट पॅक सूट घातलेला दिसत आहे. ज्यामध्ये तीन जेट इंजिन आहेत. एक पाठीमागे आणि दोन प्रत्येक हातावर आहेत. ते हवेत सहजतेने हवेत उडताना दिसत आहेत.
जानेवारीमध्ये, भारतीय लष्कराने फास्टट्रॅक प्रक्रिया (FTP) द्वारे ४८ जेटपॅक सूट खरेदी कऱ्याचे देखील सांगितले आहे. सध्या भारतीय लष्कर मे २०२० मध्ये सुरू झालेल्या पूर्व लडाख सीमेच्या वादानंतर चीनबरोबरच्या जवळजवळ ३,५०० किमी वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) संपूर्ण पाळत ठेवत आहे. त्यामुळे हे जेट पॅक भारतीय जवानांना मदत करतील.