Shubhanshu Shukla_Narendra Modi
देश
Shubhanshu Shukla: " ना बॉर्डर-ना देश, फक्त..."; अंतराळात असलेल्या शुभांशू शुक्लांनी PM मोदींना सांगितलं पृथ्वी दिसते कशी?
Shubhanshu Shukla : भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधताना अवकाशातील अनुभवांचे वर्णन केलं.
Shubhanshu Shukla Interact with PM Modi : ‘‘अवकाशातून पहिल्यांदा भारताकडे पाहिले, तेव्हा आपण नकाशावर पाहतो, त्यापेक्षा कितीतरी मोठा, भव्य भारत मला दिसला,’’ अशा शब्दांमध्ये भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी शनिवारी अवकाशातील अनुभवांचे वर्णन केले. तर, ‘‘तुम्ही पृथ्वीपासून खूप दूर असला, तरी प्रत्येक भारतीयाच्या हृदयामध्ये आज तुम्हाला स्थान आहे,’’ या प्रत्येक भारतीयांच्या मनातील भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या.