Indian Coast Guard Operation Video: तटरक्षक दलाची मोठी कारवाई! अरबी समुद्रामार्गे भारतात घुसखोरी करणाऱ्या नऊ पाकिस्तानीना पकडलं!

Coast Guard nabs nine Pakistanis : तटरक्षक दलाच्या जवानांनी "अल-मदिना" ही पाकिस्तानी बोट देखील ताब्यात घेतली आहे.
Indian Coast Guard personnel during a high-alert maritime operation in the Arabian Sea after detaining Pakistani nationals attempting illegal infiltration into Indian waters.

Indian Coast Guard personnel during a high-alert maritime operation in the Arabian Sea after detaining Pakistani nationals attempting illegal infiltration into Indian waters.

esakal

Updated on

Indian Coast Guard Conducts Major Maritime Operation : भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी अरबी समुद्रातून भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या नऊ पाकिस्तानींना अटक केली आहे. जवानांनी "अल-मदिना" ही पाकिस्तानी बोट अडवली आणि मच्छिमारांच्या वेशात आलेल्या पाकिस्तानींनी अटक केली. सर्व आरोपींना सध्या गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर नेण्यात येत आहे. 

याबाबत प्राप्त माहितीनुसार,  भारतीय तटरक्षक दलाचे गस्त घालणारे जहाज अरबी समुद्रात नियमित देखरेख करत होते. दरम्यान अचानक, रडारवर संशयास्पद हालचाली आढळल्या. आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळ भारतीय जलक्षेत्रात एक बोट फिरताना दिसत होती. ती सामान्य मासेमारीची बोट वाटत नव्हती, कारण तिच्या हालचाली संशयास्पद दिसत होत्या. यामुळे तटरक्षक दलास संशय आला आणि त्यांनी ती बोट अडवली.

भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने बोटीकडे मोर्चा वळताच, त्यावरील पाकिस्तानी घुसखोर घाबरले. त्यांनी भारतीय जहाज आपल्याकडेच येत असल्याचे पाहून त्यांची बोट परत पाकिस्तानकडे वळवली आणि इंजिनचा वेग वाढवला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न सुरू केला, परंतु भारतीय सैनिकांनी त्यांच्या बोटीला घेरले आणि सर्वांना अटक केली.

Indian Coast Guard personnel during a high-alert maritime operation in the Arabian Sea after detaining Pakistani nationals attempting illegal infiltration into Indian waters.
municipal elections exit poll 2026 : मुंबईत भाजप-शिवसेना महायुतीच भारी; ठाकरेंचा गड ढासळणार अन् काँग्रेस आघाडीलाही फटका

अटक करण्यात आलेल्या नऊ पाकिस्तानींना बांधून गुजरातमधील पोरबंदर किनाऱ्यावर आणले जात आहे. पोरबंदर हे एक प्रमुख सुरक्षा केंद्र आहे. या ठिकाणी बोट किनाऱ्यावर पोहोचताच, देशातील सर्व गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांचे अधिकारी आधीच तेथे उपस्थित असतील. गुप्तचर विभाग आता या घुसखोरांच्या पाकिस्तानातून भारतात येण्याच्या उद्देशाची चौकशी करेल. तर, गुजरात एटीएस दहशतवादी अँगल आणि स्थानिक नेटवर्कची चौकशी करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com