esakal | India: परंपरा अभ्यासक्रमात हव्यात : मनसुख मंडाविया
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया

परंपरा अभ्यासक्रमात हव्यात : मनसुख मंडाविया

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : भारतीय परंपरांची मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यातील भूमिका लक्षात घेऊन त्यांचा वैद्यकीय अभ्यासक्रमात समावेश व्हावा, असे मत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी व्यक्त केले.

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले, की मानसिक आजार बरे करण्याचा पारंपरिक मार्ग आपण समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे, या पंरपरांची भूमिका लक्षात घेऊन आपण त्यांचा अभ्यासक्रमात समावेश करू शकतो का, याबाबत मी विचार करत आहे.’’

हेही वाचा: काश्‍मीरमध्ये मोठी कारवाई; दहशतवाद्यांशी संबंधित 900 जण ताब्यात

आपले सर्व सण मानसोपचाराचा एक भाग आहेत. धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम, संमेलने, दररोज सकाळी म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थना, आरती या सर्वांचा मानसिक आरोग्याशी संबंध आहे. या परंपरा मानसिक समस्या दूर करण्यासाठी वापरल्या जात असत.

- मनसुख मंडाविया, केंद्रीय आरोग्यमंत्री

loading image
go to top