First Rupee Coin History: जेव्हा एका रूपयापुढे फिकी पडली होती सोन्या-चांदीची नाणी

266 वर्षांपूर्वी 19 ऑगस्ट 1757 रोजी भारतात पहिल्यांदा एक रूपयाचे चलन नाण्याच्या स्वरूपात जारी करण्यात आले. सुरुवातीच्या काळात त्याची व्याप्ती मर्यादित होती, परंतु ही तारीख इतिहासात ठळक अक्षरात नोंदली गेली. हे नाणं कशासाठी आणलं ते जाणून घ्या.
First Rupee Coin History
First Rupee Coin HistorySakal

भारतातील नाण्यांचीही स्वतःची वेगळी अशी ओळख आणि त्यामागील मनोरंजक गोष्टी आहेत. एक रूपयाच्या नाण्याचा इतिहास आणखीनच खास आहे. कारण हे नाणं अशावेळी चलनात आलं, जेव्हा देशात विविध प्रकारच्या चलनांचा वापर सुरू होता. या चलनांमुळे व्यापारात अडचणी निर्माण होत होत्या. या अडचणी संपुष्टात आणण्यासाठी एक रूपयाचं नाणं आणण्याची गरज भासली होती.

आजपासून बरोबर 266 वर्षांपूर्वी 19 ऑगस्ट 1757 रोजी भारतात पहिल्यांदा एक रूपयाचे चलन नाण्याच्या स्वरूपात अस्तित्वात आले. सुरुवातीच्या काळात त्याची व्याप्ती मर्यादित होती, परंतु ही तारीख इतिहासात ठळक अक्षरात नोंदली गेली

First Rupee Coin History
R Thyagarajan : 6000 कोटी रूपयांची संपत्ती दान करणारे त्यागराजन कोण आहेत? CIBIL न तपासताच त्यांची कंपनी देते कर्ज

कोलकात्यामधील टाकसाळात पाडली नाणी

एक रूपया मूल्य असलेलं हे नाणं ईस्ट इंडिया कंपनीने जारी केलं होतं आणि ते तयार झालं होतं कोलकात्याच्या टाकसाळीत. दरम्यानच्या काळात प्लासीची लढाई संपली होती आणि नुकतीच ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटीश राजवट सुरू झाली होती. ईस्ट इंडिया कंपनी तत्कालीन बंगालच्या मुघल प्रांतात चालवली जात होती. बंगालच्या नवाबाशी झालेल्या तहानंतर कंपनीने आपलं बस्तान तिथे बसवलं होतं.

First Rupee Coin History
या आहेत देशातील टॉप कर बचत योजना

त्या काळी देशाच्या विविध भागांत वेगवेगळी चलन प्रचलित होती, त्यामुळे व्यवसायात समस्या येऊ लागल्या. त्यानंतर 1835 मध्ये एकसमान नाणी कायदा संमत झाला आणि त्यानंतर तेच चलन संपूर्ण देशात वापरात येऊ लागलं. विविध चलनांची प्रथा संपुष्टात येऊ लागली. तोपर्यंत इंग्रजांनी संपूर्ण देश ताब्यात घेतला होता. त्यानंतर या नाण्यांवर ब्रिटीश राज्यकर्त्यांची चित्र कोरली जाऊ लागली. यापैकी राणी व्हिक्टोरियाचं चित्र सर्वात उल्लेखनीय होतं.

पूर्वी नाणी कशी चालत होती?

पण प्रश्न असा पडतो की कोलकाता टांकसाळीतून जर एक रूपयाचं नाणं 1757 साली पाडलं तर त्याआधी येथे कोणत्या प्रकारची नाणी तयार होत होती. तर येथे तयार व्हायची सोने, चांदी आणि तांब्याची नाणी. ज्यांना अनुक्रमे कॅरोलिना, अँजेलिना आणि कोप्रून असं म्हटलं जायचं.

First Rupee Coin History
दररोज 416 रुपये गुंतवा,कोट्यधीश बनवेल ही सरकारी स्कीम!

पुढे जेव्हा भारत स्वतंत्र झाला तरी, 1950 पर्यंत देशात ब्रिटीश कोप्रून नाणी चलनात होती. यानंतर भारताने आपली नाणी पाडण्यास सुरुवात केली. 1962 साली एक रुपयाचं नाणं चलनात आलं, जे आजही बाजारात आहे. मात्र त्यांच्या रचनेत बदल झाले असले, तरी नाण्याच्या मूल्यात कोणताही बदल झालेला नाही.

एक रूपया म्हणजे 16 आणे

पूर्वी एक रूपया म्हणजे 16 आणे. म्हणजे त्यावेळी एक रुपया 64 पैसे किमतीचे नाणे होते. त्या काळात एक आणे, दोन आणे आणि अर्धा आणे ही नाणीही चलनात होती. एक आणे म्हणजे चार पैसे. 1947 मध्ये अर्ध्या पैशाचे नाणे औपचारिकपणे बंद करण्यात आले. एक, दोन, तीन, पाच, 10, 20, 25, 50 पैशांची नाणी बराच काळ चलनात राहिली.

एक पैशाचे नाणे 1957 ते 1972 पर्यंत चलनात होते. 1964 ते 1972 या काळात तीन पैशांची नाणी पाडण्यात आली आणि चलनात आली. त्याच वेळी 1957 ते 1994 दरम्यान पाच पैशांची नाणी काढण्यात आली आणि ती चलनात राहिली. 1964 ते 1971 या काळात 10 पैशांची नाणी काढण्यात आली. 1964 ते 1972 या काळात 25 पैशांची नाणी आणि 1964 ते 1971 या काळात 50 पैशांची नाणी टाकण्यात आली. सरकारने 2011 मध्ये छोट्या नाण्यांवर औपचारिक बंदी घातली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com