आली अंगावर घेतली शिंगावर; संतप्त गव्याचा Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

आली अंगावर घेतली शिंगावर; संतप्त गव्याचा Video Viral

सध्या एका गव्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून गवा आपल्या शिंगाने एका रिक्षाला डोक्यावर उचलून आपटताना दिसत आहे. गवा संतप्त असल्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचं आपल्याला दिसत असून हा व्हिडिओ पाहून आपल्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

(Auto Rikshaw Gaur Viral Video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक गवा रात्रीच्या वेळेला रिक्षाला धडक देताना आपल्याला दिसत आहे. त्याच्या धडकेत रिक्षा पूर्ण उचलला आहे. उचलून खाली आपटल्याने रिक्षाचे नुकसान झाले असून रिक्षामध्ये असलेल्या प्रवाशांना संदर्भातील माहिती समोर आली नाही.

दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडिओ सिंधुदुर्गातील असल्याची अफवा पसरली होती पण हा व्हिडिओ केरळमधील असल्याची माहिती वनक्षेत्रपालाने दिली आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गात एका गव्याने धुमाकुळ घातला होता. त्याच गव्याने रिक्षाला धडक दिल्याची माहिती होती पण हा व्हिडिओ केरळमधील असल्याचं वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी दिली आहे.

Web Title: Indian Gaur Auto Rikshaw Viral Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :viral video