Jharkhand Sports News : खेळाडूंच्या शासकीय नोकऱ्या, वैद्यकीय विमा आणि आधुनिक प्रशिक्षण सुविधांसाठी झारखंड ऑलिम्पिक असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना सादर केले दहा कलमी निवेदन

Sports News | Indian Lawn Bowls Team | Jharkhand Sports Development : न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय लॉन बॉल्स स्पर्धेत विजेतेपद मिळवून परतलेल्या भारतीय खेळाडूंनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेतली. यावेळी झारखंडमधील क्रीडा विकासासाठी दहा कलमी निवेदन सादर केले.
Jharkhand Sports Development :

Jharkhand Sports Development

esakal

Updated on: 

झारखंड : न्यूझीलंडमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय लॉन बॉल्स स्पर्धेत विजेतेपद पटकावून मायदेशी परतलेल्या भारतीय संघातील खेळाडूंनी बुधवारी रांची येथे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची सदिच्छा भेट घेतली. झारखंड ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. मधुकांत पाठक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या भेटीत मुख्यमंत्र्यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Loading content, please wait...