Farmers Law Repeal | काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

delhi tractor parade farmers congress rahul gandhi

काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

sakal_logo
By
ओमकार वाबळे

केंद्राने पारीत केलेले तीन शेतकरी कायदे रद्द झाल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेत्यांनी आज शेकऱ्यांच्या एकजूटीचा आणि संघर्षाचा विजय झाल्याची भावना व्यक्त केली. सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत केंद्राला शेतकऱ्यांसमोर झुकावं लागल्याची टीका केली. आता काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. उद्या म्हणजेच 20 नोव्हेंबरला काँग्रेसच्या वतीने देशभरात शेतकरी विजय दिवस साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये देशभरातील काँग्रेसी कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

3 शेतीविषयक कायदे रद्द झाल्यानंतर देशातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, काँग्रेस उद्या देशभरात 'किसान विजय दिवस' साजरा करणार आहे. केंद्राच्या निर्णयांविरुद्ध आणि शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण आणि उत्साही लढ्याला मान्यता म्हणून हा दिवस साजरा होणार आहे. काँग्रेसच्या वतीने विविध राज्यात किसान विजय रॅली/किसान विजय सभा आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

loading image
go to top