

The Defence Ministry signs contracts worth ₹53,866.50 crore for construction of eight advanced Indian Navy warships.
esakal
नवी दिल्ली : भारतीय नौदलासाठी पुढील पिढीतील आठ अत्याधुनिक युद्धनौका खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने आज ‘गार्डन रिच शिपबिल्डर अँड इंजिनिअर लिमिटेड’ आणि ‘गोवा शिपयार्ड लिमिटेड’सोबत ५३ हजार ८६६.५० कोटी रुपयांचे करार केले आहेत. दिल्लीमध्ये आज ‘कर्तव्य भवन-२’ येथे संरक्षण सचिव राजेशकुमार सिंह यांच्या उपस्थितीत हे करार पार पडले. भारतीय नौदलाने स्वतः आखलेला हा पहिलाच प्रकल्प आहे.