
कोची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भारताची पहिली स्वदेशी युद्धनौका INS विक्रांत भारतीय नौदलात सामील करण्यात आली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण केले. त्यावेळी त्यांनी हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे. नवीन ध्वजाचं छत्रपती शिवाजी महाराजांशी एक खास कनेक्शन आहे. स्वराज्याच्या राजमुद्रेतून प्रेरणा घेत नव्या चिन्हाच अनावरण करण्यात आलं आहे.(indian navy got a new ensign the design is taken from the seal of chhatrapati shivaji maharaj)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोचीमध्ये नौदलाच्या नव्या ध्वजाचं अनावरण केलं. हे करत असताना त्यांनी हा नवा ध्वज नौसेनेचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे. सध्याच्या ध्वजामध्ये सेंट जॉर्जचा क्रॉस लावण्यात आला होता. तसंच एका कोपऱ्यामध्ये तिरंगाही लावण्यात आला होता. मात्र जुन्या ध्वजामध्ये तिरंग्याऐवजी युनियन जॅक लावण्यात आला होता. विशेष म्हणजे, स्वराज्याच्या राजमुद्रेतून प्रेरणा घेत नव्या चिन्हाच अनावरण करण्यात आलं आहे.
आपल्याला शिवाजी महाराजांची प्रचलित अष्टकोनी राजमुद्रा माहित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यावर संस्कृतमध्ये राजमुद्रा तयार झाली. भारतात अनेक वर्षांनी प्रथमच संस्कृतभाषेत राजमुद्रा बनवली गेली. “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।। शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।” असे त्या राजमुद्रेवर लिहण्यात आलं आहे.
आज अनावरण करण्यात आलेल्या नौदलाच्या ध्वजावर राजमुद्रेचा अष्टकोनी आकार पाहायला मिळत आहे. अशातच नरेंद्र मोदी यांनी त्यांनी हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं. शिवरायांनी नौदलाचा विकास केला. अशा शब्दात गौरवास्पद उद्गार काढले आहेत.
या नव्या ध्वजामधून मात्र ब्रिटीशांच्या सर्व खुणा हटवण्यात आल्या आहेत. आता या ध्वजावर संपूर्णपणे भारतीय छाप असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.