भारतीय नौदल समुद्रात चीनला देणार टक्कर; तब्बल 200 हून अधिक 'ब्रह्मोस'ची दिली ऑर्डर! Indian Navy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BrahMos Supersonic Cruise Missile

या क्षेपणास्त्राची फिलिपाइन्ससारख्या देशांमध्ये निर्यात केली जाते. हे क्षेपणास्त्र भारताच्या DRDO आणि रशियाच्या फेडरल स्टेट युनिटरी एंटरप्राइझच्या करारानं बनवलं आहे.

Indian Navy : भारतीय नौदल समुद्रात चीनला देणार टक्कर; तब्बल 200 हून अधिक 'ब्रह्मोस'ची दिली ऑर्डर!

भारतीय नौदल (Indian Navy) लवकरच समुद्रातील शक्ती वाढवण्यासाठी 200 हून अधिक ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रं (BrahMos Supersonic Cruise Missile) खरेदी करणार आहे.

यासाठी नौदल 20 हजार कोटी रुपयांचा करार करणार आहे. संरक्षण मंत्रालयात ही प्रक्रिया जवळपास प्राथमिक अवस्थेत आहे. लवकरच या संदर्भात संरक्षण अधिग्रहण परिषदेसोबतही (Defense Acquisition Council) बैठक होणार आहे.

ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे मुख्य शस्त्र आहे, जे समुद्रात शत्रूच्या जहाजांवर हल्ला करण्यासाठी वापरलं जातं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रं युद्धनौकांवर तैनात केली जातील. अलीकडंच, कोलकाता युद्धनौकेवरून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. यासाठी अपग्रेडेड मॉड्युर लाँचरचा वापर करण्यात आला. ब्रह्मोस एरोस्पेस भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम आहे.

भारतीय नौदल स्वावलंबनाकडं पावलं टाकत आहे. क्षेपणास्त्रांव्यतिरिक्त, ब्रह्मोस एरोस्पेस पाणबुडी, जहाजे, विमाने आणि लँड प्लॅटफॉर्म देखील बनवतं. नौदलानं 200 ब्रह्मोस प्रस्तावित केले आहेत. त्याचबरोबर क्षेपणास्त्राचा स्ट्राइक रेटही वाढवण्यात आला आहे. पूर्वी ते 290 किलोमीटरपर्यंत हल्ला करायचं, पण आता त्याची क्षमता 400 किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

ब्रह्मोस का खास आहे?

या क्षेपणास्त्राची फिलिपाइन्ससारख्या देशांमध्ये निर्यात केली जाते. हे क्षेपणास्त्र भारताच्या DRDO आणि रशियाच्या फेडरल स्टेट युनिटरी एंटरप्राइझच्या करारानं बनवलं आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र जहाज, पाणबुडी, विमान आणि जमिनीवरून डागता येतं. हे जगातील सर्वात वेगवान जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्र आहे. पाण्याखाली 40 मीटर खोलीतूनही ते उडवलं जाऊ शकतं.