Sam Pitroda: ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

Loksabha Election 2024: पित्रोदा यांचा एक व्हिडिओ व्हायरल केला जात आहे.
Sam Pitroda
Sam Pitroda

नवी दिल्ली- इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पित्रोदा यांचा एक व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. यात पित्रोदा म्हणत आहेत की, 'पूर्वेतील लोक चिनी लोकांसारखे दिसतात, पश्चिमेकडील लोक अरबांप्रमाणे दिसतात, उत्तरेतील लोल गौरवर्णीय लोकांप्रमाणे आहेत तर दक्षिणेकडील लोक आफ्रिकेतील लोकांप्रमाणे दिसतात.'

सॅम पित्रोदा हे भारतीय विविधतेबाबत बोलत होते. यावेळी त्यांनी हे भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की, 'भारताच्या विविध भागामध्ये राहणारे लोक जगातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या लोकांप्रमाणे दिसतात. त्यामुळे याचा काहीही फरत पडत नाही. आपण सगळे एक आहोत.' लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांचे हे वक्तव्य राजकीय मुद्दा बनवला जाण्याची शक्यता आहे.

Sam Pitroda
PM Modi on Pitroda: सॅम पित्रोदांच्या 'वारसा संपत्ती'वरील विधानावर PM मोदींचं भाष्य; म्हणाले, "जिंदगी के साथ भी..."

सॅम पित्रोदा यांनी स्टेस्टमंनला मुलाखत दिली होती. यात ते म्हणताना दिसत आहेत की, भारत हे लोकशाहीचे उत्तम उदाहरण आहे. छोट्या-मोठ्या काही घटना घडल्या असतील. पण, देशाच्या स्वातंत्र्यापासून भारतीय खूप चांगल्या वातावरणात राहिले आहेत. भारतीय विविध भाषा, संस्कृती, अन्न यांचा आदर करतात. हा भारत आहे ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. येथे सगळ्यांना स्थान आहे, इथे प्रत्येकजण काही प्रमाणात तडजोड करायला तयार आहे.

Sam Pitroda
Crypto Fraud: 'क्रिप्टो किंग' सॅम बँकमन-फ्राइडला कोर्टाने का सुनावली 25 वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण?

काँग्रेस पुन्हा बॅकफूटवर

पित्रोदा यांनी काही दिवसांपूर्वी वारसा संपत्तीबाबत भाष्य केलं होतं. यावरुन भाजपने राळ उठवली होती. काँग्रेस या मुद्द्यावरुन बॅकफूटवर गेली होती. पित्रोदांच्या या नव्या वक्तव्यावरूनही काँग्रेसने आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न केलं आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सॅम पित्रोदा यांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी आणि स्वीकार करण्यासारखं नाही. काँग्रेस पक्ष पित्रोदा यांच्या वक्तव्यापासून स्व:ताला वेगळं करते असं ते म्हणालेत.

मंडी लोकसभा मतदारसंघाची उमेदवार कंगना रनौत हिने सॅम पित्रोदा यांचा हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. सॅम पित्रोदा हे राहुल गांधी यांचे गुरु आहेत. पित्रोदा फोडा आणि राज्य कराची नीती वापरत आहेत. आपल्या नागरिकांबाबत असं वक्तव्य करणं दुर्दैवी आहे, असं ती म्हणाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com