Women In Police : पोलिस दलात ‘बॉस महिलां’ची संख्या तुरळक, कनिष्ठ पदांवर ९० टक्के प्रमाण; ‘टाटा’चा अहवाल
Gender Equality : इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२५’ नुसार भारतातील पोलिस दलात महिलांचे प्रतिनिधित्व अत्यंत कमी असून कोणत्याही राज्याने ते उद्दिष्ट गाठलेले नाही.
नवी दिल्ली (पीटीआय) : भारतातील पोलिस दलात महासंचालक आणि पोलिस अधीक्षक यांसारख्या वरिष्ठ पदांवर एक हजारपेक्षा कमी महिला आहेत. पोलिस दलातील ९० टक्के महिला कॉन्स्टेबल पदावर काम करीत आहेत.