
लांबपल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र शय्याव्यवस्था
मुंबई : भारतीय रेल्वेने आपल्या रेल्वेगाड्यांमध्ये एका नव्या सुविधेचे उद्घाटन नुकतेच केले आहे. रेल्वे डब्यातील आसनाच्या बाजूला baby birth बसवण्यात आला आहे. त्यामुळे लहान मुलांना घेऊन प्रवास करणाऱ्या पालकांची सोय झाली आहे.
हेही वाचा: भारतीय रेल्वे होणार अधिक सुरक्षित, 4G स्पेक्ट्रमला केंद्राची मंजुरी
सध्या हा baby birth काही निवडक ट्रेन्समध्ये प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आला आहे. मातृदिनाच्या निमित्ताने या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर ही सुविधा सर्व गाड्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हे बेबी बर्थ खालच्या आसनाला जोडण्यात आले असून ते दुडून ठेवता येतात. तसेच बाळ खाली पडू नये म्हणूनही व्यवस्था करण्यात आली आहे. ही सुविधा उत्तर रेल्वेच्या लखनऊ आणि दिल्ली विभागाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आली आहे. हा बर्थ कसा वापरावा याची चित्रफीत रेल्वेने समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहे.
लखनऊ मेलच्या कोच 194129/ B4, berth no 12 & 60 मध्ये एक बेबी बर्थ प्रायोगिक तत्त्वावर लावण्यात आला आहे. समाजमाध्यम वापरकर्त्यांनी रेल्वेच्या या सुविधेचे कौतुक केले आहे.
Web Title: Indian Railway Introduces Baby Birth In Mails
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..