
नवी दिल्ली (पीटीआय) : महत्त्वाच्या सुरक्षा कामात कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबतच्य धोरणाबद्धल रेल्वेचे सुरक्षा आयुक्त ए. एम. चौधरी यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. सुरक्षेबाबत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या लोकांवर जबाबदारी सोपविणे आणि त्यांना जादा अधिकार देणे चिंताजनक आहे. त्याचा आढावा घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. येत्या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा उपयोग किमान करावा आणि पुढे अशी पद्धत कालबद्ध रितीने बंद करावी, असा सल्ला दिला.