
भारतीय रेल्वेने तिकीट आरक्षण प्रक्रियेला अधिक कार्यक्षम करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच या सुधारणांचा आढावा घेतला आणि तिकीट प्रणाली स्मार्ट, पारदर्शक, प्रवासी-केंद्रित आणि कार्यक्षम असावी, यावर भर दिला. त्यांनी भारतीय रेल्वेने प्रस्तावित केलेल्या नव्या सुधारणा आणि त्यांचा प्रवाशांवर होणारा परिणाम याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.