
Video : काठ्यांनी बदडून काढले चिनी सैनिक? व्हीडिओने सोशल मीडियात धुमाकूळ
India-China border clash in Arunachal Pradesh Tawang
अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये ९ डिसेंबर रोजी चकमक झाली. सुरुवातीला यामध्ये दोन्ही बाजूचे ३० सैनिक जखमी झाल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु आज संरक्षणमंत्र्यांनी भारतीय सैनिक किरकोळ जखमी झाल्याचं स्पष्ट केलं आहे.
सध्या एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये भारतीय सैनिक चिनी सैनिकांना बेदम मार देत आहेत. लाठ्या-काठ्यांनी मारुन भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना पिटाळून लावलं. सोशल मीडियावर हा व्हीडिओ धुमाकूळ घालत आहे.
हेही वाचाः इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....
या व्हीडिओची पुष्टी अधिकृतरित्या झालेली नाही. अनेक न्यूज चॅनेल्सनी हा व्हीडिओ चालवला आहे. शिवाय पत्रकारांनीही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
९ डिसेंबर रोजी घडलेली ही घटना काल १२ डिसेंबर रोजी उघड झाली. त्यानंतर त्या घटनेशी संबंधीत एकेक मुद्दे समोर आलेले आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहाबाहेर भारतीय जवानांच्या शौर्याचं कौतुक केलं.
त्यानंतर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग सांगितलं की, चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांच्या तळावर हल्ला केला होता. आपल्या जवानांनी तात्काळ त्यांच्या सैनिकांना प्रत्युत्तर दिलं आणि त्यांना पळवून-पळवून माघारी धाडलं.