देशात कोरोनाचा उद्रेक ! ४८ तासांत जवळपास १ लाख कोरोनाबाधितांची भर

अशोक गव्हाणे
Monday, 27 July 2020

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात वाढला असून देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता १४ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील दोन दिवसांत म्हणजेच ४८ तासांत जवळपास एक लाख नव्या रुग्णांची भर पडली आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात वाढला असून देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता १४ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील दोन दिवसांत म्हणजेच ४८ तासांत जवळपास एक लाख नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच, मागील चोवीस तासांत देशभरात आढळलेल्या कोरोना रुग्ण संख्येबरोबरच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशभरात मागील २४ तासांत तब्बल ४९ हजार ९३१ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, ७०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १४ लाख ३५ हजार ४५३ वर पोहचली आहे. यामध्ये ४ लाख ८५ हजार ११४ अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज देण्यात आलेले ९ लाख १७ हजार ५६८ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ३२ हजार ७७१ जणांचा समावेश आहे. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे.

दरम्यान, एक दिलासादायक कोरोनाच्या आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांची संख्या ६३.९२ टक्के इतकी आहे. देशात सलग चौथ्या दिवशी ४५ हजारांपेक्षा नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या तमिळनाडूमध्ये २०६७३७, कर्नाटकमध्ये ९०,९४२, आंध्र प्रदेशमध्ये ८८६७१, पश्चिम बंगालमध्ये ५६३७७, उत्तर प्रदेशमध्ये ६३७४२, दिल्लीमध्ये १२९५३१, गुजरातमध्ये ५४६२६, बिहारमध्ये ३६६०४, झारखंडमध्ये ७८३६, राजस्थानात ३५२९८, ओडिशामध्ये २४०१३ इतकी आहे.

अन्य राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्येही कोरोनाचे रुग्ण लक्षणीय प्रमाणात आढळून आले आहेत. दिवभरात ४ लाख ४२ हजारांहून अधिक चाचण्या इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी देशभरात ४,४२,२६३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून, हा आजवरचा उच्चांक आहे. २५ जुलैपर्यंत देशभरातील कोरोना चाचण्यांची एकूण संख्या १,६२,९१,३३१ झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indias COVID-19 cases reach 14L from 13L in 2 days after biggest daily jump

टॉपिकस