जगात सर्वाधिक कोविड-19 चाचण्या करणाऱ्यांमध्ये भारत; आरोग्य मंत्रालयाचा दावा

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 4 September 2020

सध्या भारत जगात कोरोनाच्या चाचण्या घेण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भुषण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. जगभरात अमेरिका, ब्राझील आणि भारतात कोरोना रुग्णांची वाढ लक्षणीय दिसत आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत अमेरिकेत प्रतिदिन सर्वाधिक रुग्ण सापडत होते. पण आात यातही भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रसाराबरोबरच चाचण्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिसत आहे. गुरुवारी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली. यात दिलेल्या माहितीनुसार, भारतात मागील 24 तासांत 11 लाख 72 हजार 179 कोरोनाच्या चाचण्या झाल्या. यामुळे भारतात आतापर्यंत 4 कोटी 55 लाख 9 हजार 380 कोरोणाच्या चाचण्या झाल्या आहेत. गुरुवारी झालेल्या चाचण्या आतापर्यंत एका दिवसात केलेल्या सर्वाधिक कोरोना चाचण्या ठरल्या आहेत. सध्या भारत जगात कोरोनाच्या चाचण्या घेण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भुषण यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चाचण्यांचे प्रमाण जरी वाढल्यामुळे देशात कोरोना रुग्णांचे निदान मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील 24 तासांत देशात 83 हजार 883 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. भारतात पहिल्यांदाच एका दिवसात 80 हजारांच्या वर रुग्ण मिळाले आहेत. त्याबरोबर 1 हजार 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 67 हजार 376 जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. देशात कोरोनाची बाधा झालेल्यांचा आकडा 38 लाख 53 हजार 407 इतका झाला आहे. यातील 29 लाख 70 हजार 493 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर सध्या 8 लाख 15 हजार 538 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या देशात महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि आंध्रप्रदेश या पाच राज्यात कोरोनाने होणाऱ्या मृत्यूची संख्या सर्वाधिक आहे. एकूण मृत्यूंपैकी 70% मृत्यू ह्या 5 राज्यांमधील आहेत. मागील एका आठवड्याचा  विचार केला तर आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे आणि दिल्ली आणि कर्नाटकमध्ये त्याची वाढ झाली आहे.  तसेच महाराष्ट्रात सर्वात जास्त 24.77 टक्के आणि  आंध्र प्रदेशात 12.64 टक्के कोरोना रुग्ण आहेत, अशी माहितीही भूषण कुमार यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indias Covid 19 tests per day highest in the world says health ministry