esakal | देशात कोरोनानं २ लाखांहून अधिक मृत्यू; आरोग्य मंत्री म्हणतात भारताचा मृत्यूदर कमीच!

बोलून बातमी शोधा

harshwardhan.

देशात कोरोनानं २ लाखांहून अधिक मृत्यू; आरोग्य मंत्री म्हणतात भारताचा मृत्यूदर कमीच!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : देशात कोरोनानं आजवर २ लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. दरम्यान, भारताचा मृत्यूदर हा जगातील इतर देशांच्या तुलनेत कमी असल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे. आरोग्य मंत्र्यांच्या मते भारताचा कोरोना मृत्यूदर हा १.११ टक्के इतका आहे.

देशात गुरुवारी एकाच दिवसात ३,७९,२५७ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले तर ३,६४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी हा दावा केला आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या विरोधीपक्ष नेत्यांनी दावा केला होता की, सर्वत्र कोरोना महामारी पसरत असताना मृत्यूचे आकडे कमी दाखवले जात आहेत.

डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं होतं की, देशातील डॉक्टर मंडळी महामारीच्या सुरुवातीला काळात कोरोना विषाणूच्या प्रकाराबाबत अनभिज्ञ होते. पण आता ते पूर्ण तयार झाले असून या विषाणूशी कसं लढायचं याचं त्यांना ज्ञान आलं आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारताला चांगलंच झोडपून काढलं आहे. भारताला या बिकट परिस्थितीत जगातील अनेक देशांनी मदतीचा हात दिला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, ४० देशांतून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.