भारताचा आर्थिक विकास वेगाने, महागाई स्थिर : पंतप्रधान

वृत्तसंस्था
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

''सध्या देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. महागाई स्थिर असून, मध्यमवर्गाचा विकास अतिशय वेगाने सुरू आहे''.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

देहरादून : ''सध्या देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. महागाई स्थिर असून, मध्यमवर्गाचा विकास अतिशय वेगाने सुरू आहे'', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) सांगितले. तसेच मला गुजरातचा दक्षिण कोरिया करायचा होता, असेही ते म्हणाले. 

देहरादून येथे 'उत्तराखंड इन्वेस्टर्स समिट'मध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, ''ज्यावेळी मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो. तेव्हा तुम्हाला गुजरातचे काय करायचे आहे, असा सवाल करण्यात आला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना मी दक्षिण कोरिया असे उत्तर दिले होते. दक्षिण कोरिया आणि गुजरातची लोकसंख्या समान आहे. दोन्ही देशांना समुद्र किनारा लाभला आहे. 

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ''भारताचा आर्थिक विकास अतिशय वेगाने होत आहे. देशाच्या कर व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवले आहेत. आम्ही 14 हजारांहून अधिक कायदे रद्द केले आहेत. करप्रणाली सुधारणा करुन ती अधिक पारदर्शक केली आहे''.
 

Web Title: Indias economic growth inflation stable says PM Narendra Modi