
श्रीनगर: श्रीनगर येथील ‘शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान विद्यापीठा’तील संशोधकांच्या एका समूहाने भारताची पहिली जनुकीय बदल केलेली मेंढी तयार केली आहे. चार वर्षांच्या संशोधनानंतर मेंढीमध्ये जनुकीय बदल यशस्वी झाला असून, त्यामुळे मेंढींच्या स्नायूंचे वजन ३० टक्क्यांनी वाढेल, असे संशोधक म्हणतात.