ओमिक्रॉनवरील पहिल्या स्वदेशी mRNA लशीची मानवी चाचणी फेब्रुवारीत

ओमिक्रॉनवरील (Omicron) देशातील पहिल्या mRNA लसीची मानवी चाचणी (Human Trial) फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे.
human trial of India's first mRNA vaccine on omicron
human trial of India's first mRNA vaccine on omicronsakal

ओमिक्रॉनवरील (Omicron) देशातील पहिल्या mRNA लसीची मानवी चाचणी (Human Trial) फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. पुणे स्थित जिनोवा फार्मासेटीकल्सने लसीचा फेज २ डेटा सादर केला आहे आणि फेज ३ डेटाही पूर्ण केला आहे. ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाची तज्ञ समिती हा डेटा लवकरच पडताळेल, अशी माहिती अधिकृत सुत्रांकडून मिळत आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटसाठी जिनोवा फार्मासेटीकल्सने (Gennova Biopharmaceuticals) mRNA लस (Vaccine) विकसित केली आहे. तिची योग्यता आणि प्रभाविता तपासण्यासाठी लवकरच मानवी चाचणी केली जाईल असे सुत्रांनी सांगितले.

human trial of India's first mRNA vaccine on omicron
राज्यात 41 टक्के मुलांना लसीकरण

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला जिनोवा एक प्रेसस्टेटमेंटद्वारे लसीबद्दलची माहिती दिली होती. जिनोवाने याबाबतचा अंतरिम फेज 1 डेटा CDSCO कडे सादर केला होता. त्यानंतर ही लस HGCO19 सुरक्षित असल्याचं समजले होते. जिनोआने DBT-ICMR क्लिनिकल ट्रायलचा वापर केला होता. फेज 2 मध्ये देशातील साधारणपणे 10-15 साईट्स तसेच फेज 3मध्ये 22-27 साईट्सचा अभ्यास केला गेला. mRNA लस न्युक्लियर एसिड वॅक्सिन श्रेणीतील लस आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com