esakal | बहारिनसोबत भारताचे जुने व्यापारी संबंध : पंतप्रधान
sakal

बोलून बातमी शोधा

बहारिनसोबत भारताचे जुने व्यापारी संबंध : पंतप्रधान

भारताचे बहारिनसोबत जुने व्यापारी संबंध आहेत. आपले संबंध फक्त सरकारचे नाहीतर संस्काराचे आहेत. या देशातील मातीने नवी उडाण दिली आहे. नवे पंख दिले आहेत. नवी संधी दिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) सांगितले. 

बहारिनसोबत भारताचे जुने व्यापारी संबंध : पंतप्रधान

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

बहारिन : भारताचे बहारिनसोबत जुने व्यापारी संबंध आहेत. आपले संबंध फक्त सरकारचे नाहीतर संस्काराचे आहेत. या देशातील मातीने नवी उडाण दिली आहे. नवे पंख दिले आहेत. नवी संधी दिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) सांगितले. 

बहारिनमधील भारतीयांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी बोलत होते. जगभरातील भारतीयांना मोदींनी गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. बहारिनचे 'न्यू इंडिया'मध्ये स्वागत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, तुमचे योगदान, मेहनतीमुळे तुम्ही येथे एक स्थान बनवले आहे. तुम्ही येथील लोकांच्या मनात जागा तयार केली आहे. या गुडविलला आपल्या आणखी दृढ करायचे आहे. तुमची मेहनत भारतात राहणाऱ्या तुमच्या कुटुंबीयांच्याही कामी येत आहे. 

न्यू इंडियात आपल्या मूलभूत गरजांसाठी भटकावे लागणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. तुम्ही जेव्हा भारतात फिरता तेव्हा तुम्ही बदल पाहत आहात. 

दरम्यान, भारतात होत असलेल्या बदलांचा अनुभव तुम्हाला होत आहे का? असा प्रश्न मोदींनी विचारल्यानंतर उपस्थित जनतेकडून मोठ्या घोषणा देत प्रतिसाद दिला गेला. 

loading image
go to top