
नवी दिल्ली : भारतात रस्ते अपघातांची संख्या जास्त असल्याने आपल्याला जागतिक परिषदांमध्ये चेहरा लपवावा लागतो, अशी उद्वेगजनक टिप्पणी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत केली. तसेच भारतात वाहन चालविण्याचा परवाना मिळण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येत असल्याचेही स्पष्ट केले.