भारताची दुसरी चांद्रभरारी; ही आहेत वैशिष्ट्ये

Chandrayan
Chandrayan

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) 'चांद्रयान 2' ही महत्त्वाकांक्षी मोहीम आखली आहे. 'चांद्रयान' 15 जुलै रोजी म्हणजे उद्या पहाटे चंद्राच्या दिशेने झेपावेल. भारताच्या 'चांद्रयान 1' या मोहिमेतही यापूर्वी चंद्राची महत्त्वपूर्ण माहिती मिळविण्यात आली होती. 'चांद्रयान 2' या मोहिमेचा उद्देश, वैशिष्ट्ये आदींची ही सफर.. 

कधी होणार प्रक्षेपण? 
भारतीय प्रमाणवेळेनुसार 15 जुलै, 2019 रोजी पहाटे 2.51 वाजता 'चांद्रयान 2'चे प्रक्षेपण करण्याचे नियोजन असून, 6 सप्टेंबर 2019 रोजी ते चंद्रावर उतरणे अपेक्षित आहे. 

रोव्हर 
या मोहिमेतील रोव्हरचे वजन 20 ते 30 किलो असेल. त्याचप्रमाणे तो सौरऊर्जेवर चालेल. चंद्राच्या पृष्ठभागावर तो चाकांच्या आधारे फिरून माती आणि खडकांचे नमुने गोळा करेल. त्यांचे रासायनिक विश्‍लेषण करून ती माहिती चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटरला देईल. तेथून ती पृथ्वीवरील स्थानकाकडे पाठविली जाईल. रशियाने 2010मध्ये रोव्हरचा आराखडा बनविण्यास नकार दिल्यानंतर "इस्रो'ने स्वतःच त्याचे डिझाईन करून त्याची निर्मिती केली, हे विशेष. हे रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोचल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत अशी कामगिरी करणारा जगातील चौथाच देश ठरेल. 

आयआयटी कानपूरमधील संशोधकांनी रोव्हरला गतिशीलता देण्यासाठी तीन उपप्रणाली विकसित केल्या आहेत. 
1. त्रिविम कॅमेरा : पृथ्वीवरील संशोधक पथकाला रोव्हर नियंत्रित करण्यासाठी हा कॅमेरा रोव्हरच्या आसपासची थ्रीडी दृश्‍ये काढून पाठवेल. 
2. कायनेटिक ट्रॅक्‍शन कंट्रोलर : रोव्हरला चंद्राच्या पृष्ठभागावर चालण्यास हा कंट्रोलर मदत करेल. त्यामुळे रोव्हर आपल्या सहा चाकांवर स्वतंत्ररीत्या काम करू शकेल. 
3. विजेच्या मोटर्स : रोव्हरचे प्रत्येक चाक विजेच्या स्वतंत्र मोटारीवर चालतील. त्यापैकी चार चाकांकडे स्वतंत्र स्टिअरिंगची क्षमता असेल. या सर्वांसाठी विजेच्या एकूण 10 मोटर असतील. 
छायाचित्र 64575 

मोहिमेचा कालावधी : एक वर्ष 
लॅंडर, रोव्हर 15 दिवस 

या मोहिमेतील महत्त्वाचे घटक 
- जीएसएलव्ही एमके 3 
- रोव्हर 
- लॅंडर 

जीएसएलव्ही म्हणजे काय? 
Geosynchronous Satellite Launch Vehicle (GSLV) - जीएसएलव्हीला मराठीत भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक यान म्हटले जाते. अंतराळात उपग्रह प्रक्षेपणासाठी त्याचा वापर केला जातो. जीएसएलव्हीचा वापर सर्वप्रथम 2001मध्ये करण्यात आला. आत्तापर्यंत त्याचा 12 वेळा प्रक्षेपणासाठी वापर झाला आहे. जीएसएलव्ही उपग्रहाला पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत स्थिर करण्यात मदत करतो. 
छायाचित्र 64589 

अंतराळ यान 
या मोहिमेतंर्गत आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून जीएसएलव्ही "एमके 3'च्या माध्यमातून अंतराळयान चंद्रावर पाठविण्याची योजना आहे. या यानाचे उड्डाणाच्या वेळी वजन 3,250 किलो असेल. इंटिग्रेटेड मॉड्यूलमध्ये ऑर्बिटर आणि लॅंडरचा समावेश आहे. जीएसएलव्ही "एमके 3'मधून प्रक्षेपित झाल्यानंतर ऑर्बिटरच्या प्रोपल्शल मॉड्यूल वापरून ते चंद्राच्या कक्षेत पोचेल. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर त्याचे ऑर्बिटर लॅंडरपासून वेगळे होईल. त्यानंतर, लॅंडर चंद्राच्या जमिनीवर उतरल्यानंतर रोव्हर वेगळा होईल. 

ऑर्बिटर 
चांद्रयान 2 मोहिमेतंर्गत ऑर्बिटर 100 किलोमीटर उंचीवरून चंद्राभोवती प्रदक्षिणा घालेल. या मोहिमेतंर्गत ऑर्बिटरला पाच पेलोडच्या सोबत पाठविले जाईल. यातील तीन पेलोड नवीन तर दोन पेलोड "चांद्रयान 1'मधील आहेत. उड्डाणावेळी या ऑर्बिटरचे वजन जवळपास 1400 किलो असेल. ऑर्बिटर आणि जीएसएलव्ही यानामधील इंटरफेसलाही अंतिम रूप देण्यात आले आहे. ऑर्बिटरमध्ये अनेक अत्याधुनिक उपकरणे, कॅमेरे, सेन्सर्स आहेत. प्रसिद्ध वैज्ञानिक विक्रम साराभाई यांच्या स्मरणार्थ या ऑर्बिटरला विक्रम हे नाव देण्यात आले आहे. 

लॅंडर 
लॅंडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावार उतरवले जाईल. त्यासाठी चंदाववरील दोन जागांची निवड करण्यात आली असून, त्यापैकी एक अंतिम केली जाईल. इतर कोणत्याही देशाचे लॅंडर न उतरलेल्या जागेची निवड करण्यात येईल. या लॅंडरमध्ये प्रद्युम्न नावाचा रोव्हर असेल. 

'चांद्रयान 2' मोहिमेतील पेलोड 
- लार्ज एरिया सॉफ्ट एक्‍सरे स्पेक्‍ट्रोमीटर (एलएएसएस) 
- सोलार एक्‍सरे मॉनिटर 

मोहिमेची वैशिष्ट्ये 
- चंद्राच्या पृष्ठभागावर पहिल्यांदाच रोव्हर चालणार. 
- चंद्रावरील माती किंवा खडकाचे नमुने गोळा करणार. 

'चांद्रयान 1'विषयी 
इस्रोने 2008 मध्ये "चांद्रयान 1'चे प्रक्षेपण केले होते. ही मोहीम दोन वर्षे चालेल, असे इस्रोने जाहीर केले होते. मात्र, इंधनाच्या कमतरतेमुळे 29 ऑगस्ट 2009मध्ये ही मोहीम संपविण्यात आली. या मोहिमेत "चांद्रयान 2'प्रमाणे लॅंडर आणि रोव्हरचा समावेश करण्यात आला नव्हता. 

जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉंच व्हेइकल मार्क- 3 
(जीएसएलव्ही एमके- 3) 
पहिला टप्पा 
दुसरा टप्पा 
तिसरा टप्पा 
49.13 मीटर 

यापूर्वीची याने उतरलेल्या जागा 
उत्तर 
दक्षिण 
सी ऑफ ट्रॅंक्वॅलिटी 
विषुववृत्त 
चांद्रयान- 2 उतरणार असलेली जागा 

लुना 
सर्व्हेयर 
अपोलो 

चंद्रापर्यंतचा प्रवास 
1. श्रीहरिकोटाहून चांद्रयान- 2 या 3290 किलो वजनाच्या उपग्रहाचे जीएसएलव्ही एमके- 3च्या साह्याने उड्डाण. 

2. भूस्थिर हस्तांतर कक्षेत (जीटीओ) जीएसएलव्ही एमके- 3 पोहोचल्यानंतर चांद्रयानाला 170 x20,000 किलोमीटरच्या लंबवर्तुळाकार कक्षेत सोडण्यात येईल. 

पृथ्वीच्या पृष्ठभागापासून चंद्राची कक्षा 3,82,000 किलोमीटर अंतरावर आहे. 

3. साधारण महिन्याभरानंतर चांद्रयान- 2 चंद्राच्या कक्षेत पोहोचेल. 

4. चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर ऑर्बिटर यानापासून लॅंडर वेगळा होईल आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या भागात उतरेल. तेथे अब्जावधी वर्षांपूर्वी तयार झालेले मोठ-मोठे खडक या भागात आहेत. 

बग्गी 150 -200 मीटर प्रवास करून तेथील जमिनीचे रासायनिक पृथक्करण करेल. 
पृष्ठभागावर उतरल्यानंतर बग्गी केवळ 15 मिनिटांत ऑर्बिटरच्या साह्याने माहिती पृथ्वीवर पाठविण्यास सुरवात करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com