
नवी दिल्ली : भारताच्या वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील ख्यातनाम अभ्यासक अन् लेखक वाल्मीक थापर (वय ७३) यांचे शनिवारी सकाळी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी निधन झाले. दिल्ली येथे १९५२ मध्ये जन्मलेल्या थापर यांनी राजस्थानातील रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात वाघांच्या अभ्यास व संरक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. शशी कपूर यांच्या कन्या आणि प्रसिद्ध रंगकर्मी अन् अभिनेत्री संजना कपूर यांचे ते पती होत. त्यांना एक मुलगा आहे.