Mumbai-Ayodhya Flight : मुंबई ते अयोध्या थेट विमानसेवा कधीपासून सुरू होणार? 'इंडिगो'ने दिलं उत्तर

अयोध्येतील श्रीराम एअरपोर्टचे ३० डिसेंबर रोजी लोकार्पण होणार असून यानंतर अयोध्या येथून नवी दिल्ली आणि अहमदाबाद पाठोपाठ आता इंडिगोने मुंबईसाठी देखील विमानसेवेची घोषणा केली आहे.
IndiGo announces direct Mumbai-Ayodhya flights
IndiGo announces direct Mumbai-Ayodhya flightsSakal

अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यंक्रम २२ जानेवारी रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनेक दिग्गज उपस्थित राहाणार आहेत. या कार्यक्रमाला अनेक विरोधीपक्ष नेते देखील उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमापूर्वी पीएम मोदी अयोध्येतील श्रीराम एअरपोर्टचे ३० डिसेंबर रोजी लोकार्पण करणार आहेत. यानंतर अयोध्या येथून नवी दिल्ली आणि अहमदाबाद यानंतर आता इंडिगोने मुंबईसाठी देखील विमानसेवेची घोषणा केली आहे.

IndiGo announces direct Mumbai-Ayodhya flights
Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या निर्मितीचं काम आता चालणार २४ तास; 'इतक्या' कामगारांची संख्या वाढवली

योध्या मंडल कमिश्नर गौरव दयाल यांनी सांगितलं की अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमातळाचे काम पूर्ण होण्यासोबतच अयोध्या ते दिल्ली आणि अहमदाबादच्या फ्लाइटची घोषणा करण्यात आली होती. आता इंडिगो ने मुंबई आणि अयोध्या यांच्यातील कनेक्टिव्हीटीची देखील घोषणा केली आहे. १५ जानेवारी २०२४ पासून ही सेवा सुरू होणार आहे. या विमानसेवेमुळे नागरिकांची सोय होणार आहे.

६ जानेवरी २०२४ पासून दिल्ली ते अयोध्या आणि ११ जानेवारी २०२४ पासून अहमदाबाद ते अयोध्या अशी विमान सेवा सुरू होणार आहे. इंडिगोचे अधिकारी विनय मल्होत्रा यानी याबद्दल माहिती दिली, त्यांनी सांगितलं की या खेरीज अयोध्या ते मुंबई यांच्यादरम्यान देखील थेट कनेक्टिव्हिटी प्रवास, पर्यटन आणि व्यापाराला उत्तेजण देईल.

IndiGo announces direct Mumbai-Ayodhya flights
Ayodhya Ram Mandir: 'राम मंदिराच्या उभारणीत उद्धव ठाकरेंचे योगदान काय?', भाजप-ठाकरे गट भिडले; निमंत्रणावरून राजकारण पेटलं

यापूर्वी एअर इंडियाची (Air India) सहकारी एअरलाइन इंडिया एक्सप्रेसने देखील विमानसेवेची घोषणा केली होती. एअर इंडिया एक्सप्रेसने दिल्ली ते अयोध्या या मार्गावर ३० डिसेंबर रोजी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. यानंतर १६ जानेवारीपासून दिल्ली-अयोध्या दरम्यान कोणत्याही दिवशी तुम्ही विमानसेवेचा लाभ घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com