Indigo Flight Bomb Threat: कुवेत–दिल्ली इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी; अहमदाबादमध्ये तातडीचे लँडिंग

IndiGo flight from Kuwait to Delhi received a bomb threat: धमकीची चिठ्ठी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाल केली अन् मग...
IndiGo flight  Emergency Landing at Ahmedabad Airport

IndiGo flight Emergency Landing at Ahmedabad Airport

esakal

Updated on

IndiGo flight Emergency Landing at Ahmedabad Airport मागील काही काळापासून विमान कंपन्यांना वारंवार बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमक्या मिळत आहेत. आज (शुक्रवार) कुवेतहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला देखील बॉम्बस्फोटाची आणि अपहरणाची धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली.

अशाप्रकारची धमकी आल्यानंतर विमानाचे अहमदाबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. धमकीची चिठ्ठी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने ही कार्यवाही केली. यानंतर विमानाची कसून तपासणी केली गेली. मात्र विमानात कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळलेली नाही.

 विमानतळ पोलिसांनी सांगितले की, बॉम्ब शोध पथकाने विमानाची कसून तपासणी केली आहे. सुरक्षा तपासणी पूर्ण झाली आहे आणि प्रोटोकॉलनुसार पुढील तपास सुरू आहे. दिल्लीला जाण्यासाठी विमानाला सुमारे दोन तास उशीर होवू शकतो.

IndiGo flight  Emergency Landing at Ahmedabad Airport
Virat Kohli Instagram account is active ‘किंग कोहली इस बॅक ऑन इन्स्टा’ ! लाखो फॉलोअर्सचा जीव भांड्यात पडला; जाणून घ्या, नेमकं काय झालं होतं?

यानंतर, २२ जानेवारी रोजी दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली. विमानाच्या शौचालयात धमकी असलेली एक हस्तलिखित चिठ्ठी सापडली, ज्यामुळे विमान पुणे विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com