
Indigo : मोठा अपघात टळला! टेकऑफवेळी रनवेवर जाताना चिखलात रुतलं विमान
कोलकाता : भारतात प्रवाशी विमानांमधील तांत्रिक बिघाड्या घटना थांबण्याच नाव घेत नाहीएत. गुरुवारी असाच एक प्रकार समोर आला. यामध्ये इंडिगोच्या विमानाचं (6E-757) उड्डाण रद्द करण्यात आलं. उड्डाणाच्या तयारीत असताना रनवेवर जाताना विमानाची चाक घसरली आणि थेट रनवेबाहेर चिखलात रुतलं. आसाममधील जोरहाटहून हे विमान पश्चिम बंगालमधील कोलकात्याकडं निघालं होतं. या दुर्घटनेत कोणतंही नुकसान झालेलं नाही. (IndiGo Kolkata bound flight skidded while taxing for takeoff in Jorhat)
या घटनेनंतर एका पत्रकारानं ट्विट करुन इंडियागोला टॅग केलं. या ट्विटमध्ये घसरलेल्या विमानाचा फोटो अपलोड करण्यात आला आहे. यामध्ये विमानाची दोन्ही चाकं चिखलात रुतलेली दसत आहेत. इंडिगोला टॅग करताना त्यानं म्हटलं की, गुवाहाटी कोलकाता इंडिगो विमानाचं रनवेवरुन घसरलं आणि आसाममधील जोरहाट विमानतळावर चिखलातील मैदानात फसलं. या विमानाचं दुपारी २.२० वाजता उड्डाण होणार होतं. पण या घटनेनंतर विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला.
हेही वाचा: सुनावणीदरम्यान सिद्धार्थ बांठियानं रचली बनावट कथा; हायकोर्टानं दिला दणका!
विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर ८.१५ वाजता त्याचं उड्डाण रद्द करण्यात आला. विमानात ९८ प्रवाशी उपस्थित होते. सर्व प्रवाशी विमानातून उतरले आणि सुरक्षित होते.
Web Title: Indigo Kolkata Bound Flight Skidded While Taxing For Takeoff In Jorhat
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..